दुःखाचा डोंगर —
पत्रकार विजयकुमार बेदमुथा यांचे कोरोनाने निधन
आमचे गुरुवर्य , मार्गदर्शक , ज्येष्ठ पत्रकार , दैनिक समय सारथी वृत्तपत्राचे आधारस्तंभ विजयकुमार उर्फ बाबूजी बेदमुथा यांचे कोरोनाने उपचार दरम्यान हैद्राबाद येथे उपचार दरम्यान निधन झाले. 22 एप्रिल रोजी त्यांचे बंधू ज्येष्ठ संपादक मोतीचंद बेदमुथा यांचे सुद्धा कोरोनाने उपचार दरम्यान निधन झाले होते अवघ्या 8 दिवसात पुन्हा एकदा बेदमुथा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला
मोतीचंद व विजयकुमार ही दोन भावांची जोडी पत्रकारिता क्षेत्रात राज्यभर प्रसिद्ध होती, अवघ्या 8 दिवसात हे दोन तारे निखळले असून यामुळे या क्षेत्राची मोठी अपरिमित हानी झाली आहे.
गेल्या अनेक वर्षे विजय बाबू यांनी पत्रकारिता क्षेत्रात दैनिक लोकमत , पुढारी या वृत्तपत्राच्या माध्यमातून राज्य पातळीवर कार्य केले होते तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पत्रकार यांच्या अनेक पिढ्या घडल्या आहेत. अत्यंत धार्मिक व परोपकारी वृती असलेल्या व्यक्तीवर ही वेळ येणे दुर्दैव आहे. भारतीय जैन संघटना व्दारा त्यांनी भुकंप,जलसंधारणाचे कार्य त्यांना अजरामर करणारे आहे. त्यांना उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघ व जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करीत बेदमुथा परीवाराला दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो.
विजय बाबू यांच्यावर हैद्राबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बाबूजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹