गाफीलपणा नकोच – लस घेतल्यावरही व दुसऱ्यांदा कोरोना होतो
आत्मचिंतनाची गरज – नियमांचे पालन करणे गरजेचे
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद येथील बेदमुथा परिवारातील 2 ज्येष्ठ पत्रकार यांचे 8 दिवसात निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या सारखे दुःखद प्रसंग अनेक कुटुंबात घडत असल्याने आता सर्वांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कोरोना लस घेतल्यावर काही होत नाही , दुसऱ्यांदा कोरोना होत नाही या आवेशात न वागता काळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक डॉक्टर , पोलीस, वकील , राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी कोरोनाचा बळी ठरली असून यामुळे त्यांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे.
उस्मानाबाद येथील बेदमुथा पत्रकार बंधू हे शिस्तप्रिय व आरोग्याच्या बाबतीत नेहमी दक्ष होते त्यांनी दोघांनी कोरोनाचे दोन्ही डोस वेळेवर घेत लसीकरण केले होते तसेच ते कोरोनाबाबत पूर्ण काळजी घेत होते. लसीचा दुसरा डोस झाल्यावर जवळपास 15 दिवसानी दोघे बंधू एकाच वेळी पॉझिटिव्ह आले व त्यांनतर त्यांच्यावर हैद्राबाद येथे उपचार करण्यात आले दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
कोरोना लस घेतली गाफील नको, सर्वांनी काळजी घ्या असे सामाजिक जनजागृतीचे आवाहन आम्ही यानिमित्ताने दुःखद प्रसंग असतानाही करीत आहोत. कोरोना संसर्ग हा नवीन आजार आहे त्यामुळे त्यावर अनेक संशोधन अभ्यास होणे बाकी आहे. लस घेतली की बिनधास्त असे नाही, लसचे दोन डोस घेतल्यानंतर सुद्धा कोरोना संसर्ग होऊ शकतो तसेच एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा दुसऱ्यादा कोरोना झाल्याची अनेक उदाहरणे आहेत यात डॉक्टर व राजकीय नेते मंडळीसह अनेकांचा समावेश आहे. कोरोना लस घेतल्यावर कोरोना झाला तरी तो सौम्य लक्षणे असलेला होतो किंवा मृत्यू होते नाही असे अनेक समज- गैरसमज आहेत ज्याला कोणताही वैद्यकीय आधार नाही, त्यामुळे लसीकरण तर गरजेचे सुरक्षित आहेच पण त्या सोबतच मास्क, सोशल डिस्टनस पाळणे,स्वच्छता व प्राथमिक लक्षणे दिसताच वेळीच डॉक्टर यांच्याशी संपर्क साधून उपचार करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाची ही दुसरी लाट असून आगामी काही महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.