पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृत्युदर कमी
रुग्ण संख्यात तीन पटीने वाढ मात्र मृत्युदर कमी ठेवण्यात यश
एप्रिल महिन्यात 1.83 टक्के तर सरासरी 2.40 टक्के मृत्युदर
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट कहर करीत असताना एक दिलासादायक बातमी आहे. दुसऱ्या लाटेच्या एप्रिल महिन्यात रुग्ण संख्येत पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्ण संख्या जवळपास तिप्पट झाली असताना देखील प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला मृत्युदर आटोक्यात म्हणजे कमी ठेवण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे रुग्ण संख्या अचानक वाढल्याने अनेक वैद्यकीय सुविधा व साधने अपुरे पडली असताना देखील असंख्य अडचणींवर मात करीत अनेक रुग्णाचे जीव वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या व मृत्यूचा आकडा वाढला असला तरी मृत्युदर मात्र 1.83 इतका राहिला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा आजवरचा एकूण मृत्युदर हा 2.40 च्या जवळपास आहे त्यापेक्षा कमी मृत्यू दुसऱ्या लाटेत झाले आहेत. पहिली लाट पीकवर असताना सप्टेंबर 2020 महिन्यात मृत्युदर 3.49 टक्के होता तर दुसऱ्या लाटेत तो पीकवर असताना एप्रिल महिन्यात 1.83 म्हणजे जवळपास निम्यावर आहे.
एप्रिल 2021 या महिन्यात कोरोनाने कहर करीत एका महिन्यात 17 हजार 813 जणांना बाधीत केले तर 327 पेक्षा अधिक रुग्णांचा बळी घेत अक्षरशः मृत्यूच तांडव घातले. आजवरच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत एकट्या एप्रिल महिन्यात 46.45 टक्के रुग्ण सापडले. गेल्या वर्षी 2020 मध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर या 3 महिन्याच्या काळात पहिली लाट आली त्या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात ऑगस्टमध्ये 4 हजार 524, सप्टेंबर 6 हजार 488 व ऑक्टोबर 2 हजार 554 असे 3 महिन्यात 13 हजार 566 कोरोना रुग्ण सापडले तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च महिन्यात 3 हजार 246 रुग्ण व एप्रिल महिन्यात 17 हजार 813 असे विक्रमी रुग्ण सापडले. म्हणजे एकट्या एप्रिल महिन्यात 131 पटीने अधिक रुग्ण सापडले तरी देखील प्रशासनाने योग्य नियोजन व मेहनत करीत मृत्यदर कमी ठेवला हे उपलब्ध आकडेवारी वरून समोर आले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात मे महिन्यात पहिले 2 मृत्यू झाले त्या महिन्यात मृत्युदर 2.94 टक्के होता. जून 20 मध्ये सर्वाधिक 6.09 टक्के, जुलै महिन्यात 4.57 टक्के, ऑगस्ट 2.07, सप्टेंबर 3.49, ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची पहिली लाट पीक मध्ये असताना 5.95 टक्के, नोव्हेंबर महिन्यात 4.30 टक्के,डिसेंबर 0.51 तर जानेवारी 2021 मध्ये एकही मृत्यू नव्हता, फेब्रुवारी 1.84 टक्के , मार्च महिन्यात 0.46 टक्के तर एप्रिल महिन्यात मृत्युदर हा 1.83 टक्के असा राहिला.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 2 लाख 19 हजार 786 नमुने तपासले त्यापैकी 38 हजार 348 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 29.26 टक्के आहे. जिल्ह्यात 30 हजार 341 रुग्ण बरे झाले असून 80.38 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 922 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.37 टक्के मृत्यू दर आहे.
मृत्यू आकडे तफावत व सारीचे थैमान
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर ते वेबसाईटवर अपलोड करणे गरजेचे आहे. नगर परिषदेने केलेले अंत्यसंस्कार आकडे, आरोग्य विभाग आकडे, प्रेस नोट व वेबसाईटवर उपलब्ध माहितीत तफावत आहे कारण अनेक आकडे व माहिती अपलोड केलेली नाही शिवाय सारीने मृत्यू झालेली नोंद कोरोना मृत्यूमध्ये समावेश न केल्याने आकडे जुळत नाहीत. उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक रुग्णांनी शेजारील लातूर, सोलापूर , पुणे , मुंबईसह अन्य जिल्ह्यात व कर्नाटक , आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात उपचार घेतले आहेत त्यातील काही जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे मात्र या मृत्यूची काही माहिती तिथल्या स्थानिक प्रशासन , रुगणल्याने पोर्टलवर भरणे बाकी किंवा प्रक्रियेत आहे.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी माहिती अपलोड करण्याचे आदेश सर्व वैद्यकीय अधीक्षक व यंत्रणेला दिले असून एकही मृत्यू प्रशासन लपविणार किंवा कमी दाखविणार नाही असे आश्वासन दिले आहे तसेच या प्रक्रियेला काही वेळ लागणार आहे, सध्या माहिती अपलोड करणे पेक्षा रुग्णांचे प्राण वाचविणे व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे असे स्पष्ट केले तसेच मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी व त्या कारणाने पुन्हा मृत्यू होऊ नये किंवा चूक होऊ नये यासाठी डेथ ऑडीट करण्यात येत आहे याचा आढावा दर शुक्रवारी बैठकीत घेतला जातो.
आगामी काही काळानंतर मृत्यूचे अंतिम आकडे स्पष्ट होणार आहेत मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मृत्युदर हा कमी ठेवण्यात प्रशासन व आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे हे आकडेवारीतुन दिसते.
महिना रुग्ण मृत्यू मृत्युदर
एप्रिल 3 0 0%
मे 68 2 2.94%
जुन 149 9 6.09%
जुलै 940 43 4.57%
ऑगस्ट 4524 94 2.07%
सप्टेंबर 6488 227 3.49%
ऑक्टो 2554 152 5.95%
नोव्हेंबर 1023 44 4.30%
डिसेंबर 585 3 0.51%
जानेवारी 576 0 0%
फेब्रुवारी 379 7 1.84%
मार्च 3246 15 0.46%
एप्रिल 17813 327 1.83%
एकूण 38338 922 2.40%
साप्ताहिक मृत्यूदारात 2.20 वरून 2.60 अशी वाढ झाल्याचे गेल्या 2 आठवड्याच्या आकडेवारी वरून दिसत आहे.ही बाब चिंताजनक असून मृत्युदर कमी करण्यासाठी योग्य नियोजन व प्रयत्न करणे गरजेचे आहे
12 एप्रिल – 680 रुग्ण – 05 मृत्यू
13 एप्रिल – 590 रुग्ण – 07 मृत्यू
14 एप्रिल – 613 रुग्ण – 15 मृत्यू
15 एप्रिल – 764 रुग्ण – 10 मृत्यू
16 एप्रिल – 580 रुग्ण – 23 मृत्यू
17 एप्रिल – 653 रुग्ण – 20 मृत्यू
18 एप्रिल – 477 रुग्ण – 16 मृत्यू
4357 रुग्ण- 96 मृत्यू – 2.20 टक्के
———
19 एप्रिल – 662 रुग्ण – 10 मृत्यू
20 एप्रिल – 645 रुग्ण – 21 मृत्यू
21 एप्रिल – 667 रुग्ण – 23 मृत्यू
22 एप्रिल – 719 रुग्ण – 21 मृत्यू
23 एप्रिल – 719 रुग्ण – 16 मृत्यू
24 एप्रिल – 810 रुग्ण – 20 मृत्यू
25 एप्रिल – 569 रुग्ण – 16 मृत्यू
4781 रुग्ण- 127 मृत्यू – 2.65 टक्के