धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह,नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे आयोजित केली आहे. 2024-25 च्या निधी स्थगिती अद्याप उठलेली नाही त्यामुळे ही बैठक वादळी ठरणार आहे.
15 ऑक्टोबरच्या बैठकीत 1 मे 2025 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त व इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालनास मान्यता देणे,जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण,अनुसूचित जाती उपयोजना,आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासीसाठी उपयोजना) सन 2025-26 चा माहे सप्टेंबर 25 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येईल.तसेच पालकमंत्री सरनाईक यांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात येईल.