वाशी – समय सारथी
वाशी पोलीस ठाण्याच्या पथकाने पारधी पिढी, मांडवा येथे कारवाई करत 14 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत 2 लाख 84 हजार इतकी आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संग्राम थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मांडवा येथे अंमली पदार्थांची साठवणूक केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी संजय अर्जुन शिंदे या व्यक्तीच्या राहत्या घरात गांज्याची बेकायदेशीर साठवणूक करत असल्याचे आढळले.
पोलिसांनी घटनास्थळावरून 14.236 किलो सुका गांजा जप्त केला असून, त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे 2 लाख 84 हजार 720 रुपये इतकी आहे. या गांज्याचे प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे दोन नमुने घेऊन पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी अंमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८(क), २०(ब)(२)(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.