तो मृतदेह डॉ रवींद्र वरपे यांचा – कारण अस्पष्ट
तर्क वितर्क :- पोलिसांकडून शोध सुरु
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरातील ग्रीन लॅन्ड व तेरणा अभियांत्रिकी कॉलेजच्या मध्ये असलेल्या ग्राउंडवर एका गाडीत तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती , विशेष म्हणजे जळत्या गाडीत हा मृतदेह सापडल्याने घातपात की इतर बाब याची चर्चा होत आहे. दरम्यान जळालेल्या गाडीत सापडलेला मृतदेह हा डॉ रवींद्र वरपे यांचा असल्याची माहिती समोर आली आहे, वरपे हे येडशी येथे वैद्यकीय प्रॅक्टीस करीत होते.
गाडी जळतानाचे विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पोलिस या घटनाक्रमांचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे व्हिडिओनुसार गाडीला पाठीमागून आग लागली आहे त्यामुळे पोलीस विविध शक्यता तपासत आहेत. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.