धाराशिव – समय सारथी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे 1 ऑक्टोबर रोजी मेंटल हेल्थ आणि छात्रमानस कक्षाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
१० ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून या लॅब चे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) धाराशिव चे अध्यक्ष तथा मनोविकार तज्ञ डॉ. महेश कानडे यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनाची गरज आणि Mental health in humanitarian emergencies या घोषवाक्यची माहिती देऊन या घोषवाक्यवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आपल्या अध्यक्ष भाषणात डॉ शैलेंद्र चौव्हाण म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि गरजू रुग्णांसाठी तसेच मनोविकार विभागातील नवनवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे प्रत्यक्षात हातळण्यासाठी उपलब्ध झाल्यामुळे या लॅबचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून महाविद्यालय अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवत आहे.
आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मनोविकृतीशास्त्राचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. आशिष चेपुरे यांनी मेंटल हेल्थ लॅब तसेच छात्रमानस याविषयी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी उपाधिष्ठाता डॉ. शफिक मुंडेवाडी, डॉ. उज्वला गवळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी लाकाळ, मनोविकार तज्ञ डॉ. महेश कानडे , मनोविकृतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रा. आशिष चेपुरे, मनोविकार तज्ञ डॉ. आशिष झरे, डॉ. राहुल जाधव, आधिसेविका श्रीमती सुमित्रा गोरे तसेच सर्व विभागातील विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोविकृतीशास्त्र विभाग, छात्रमानस टीम तसेच राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमातील अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केली.