आमदार कैलास पाटील यांनी पाहणी करत दिला दिलासा, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
धाराशिव – समय सारथी
शब्द नव्हे, कृती हवी,आश्वासन नव्हे, ठोस मदत हवी आता पंचनामे नव्हे तर सरसकट ठोस भरपाई हवी असे म्हणत आमदार कैलास पाटील यांनी बांधावर जात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
कळंब तालुक्यातील एकुरगा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकरी बांधवांसोबत पाहणी केली. धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या थैमानाने अक्षरशः कोलमडून गेले आहेत. जमिनी खरडून गेल्या आहेत, हिरवीगार शेतीपिकं पूर्ण उद्ध्वस्त झाली आहेत, नुकसान फक्त नदी काठच्या जमिनीचे झालंय असे नाही तर प्रत्येक शेत पाणी तुंबून तळ्यात परिवर्तित झाली आहेत. सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत, उभी पिकं मातीला मिळाली आहेत, त्यामुळे बळीराजा पूर्णतः हतबल, आणि असहाय्य झाला आहे..
सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी किमान ५० हजार रुपये सरसकट भरपाई द्यायलाच हवी जर तातडीने मदत मिळाली नाही, तर धाराशिव जिल्ह्यातून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन उभारण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.सरकारने तात्काळ ठोस पावलं उचलली नाहीत, तर ही शांत वेदना उद्या आक्रोशात बदलेल, शेतकरी आता झुकणार नाही तर सरकारलाच झुकावं लागेल असे म्हणत त्यांनी भुमिका स्पष्ट केली.
धाराशिव तालुक्यातील अंबेहोळ, जुनोनी, वलगुड, झरेगाव आणि चिलवडी येथील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यानंसमवेत पाहणी केली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातचं पीक पाण्यात वाहून गेलं आहे.. घाम गाळून उभं केलेलं आयुष्याचं सोने आज चिखला खाली गाडलं गेलं आहे.. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत.असे असतानाही राज्य सरकार मात्र ठोस निर्णय घेताना दिसत नसून पंचनाम्याच्या घोषणावरच समाधानी आहे..
बळीराजा आज अन्नदाता नसून ‘ऋणदाता’ झालाय, नुकसानीने, कर्जाने आणि सरकारच्या उदासीनतेने त्याचं भविष्य उद्ध्वस्त झाले आहे.धाराशिव तालुक्यातील अंबेहोळ, जुनोनी, वलगुड, झरेगाव आणि चिलवडी येथील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यानंसमवेत पाहणी केली..
आज प्रत्येक गावची अवस्था हृदय पिळवटून टाकणारी आहे, जिथे हिरवीगार पिकं डोलत होती तिथे आता केवळ उध्वस्त शेतं दिसत आहेत, संसार उघड्यावर आले आहेत, घरांची पडझड झाली आहे, पाणी साचून पीक कुजली आहेत तर कुठ तळ्यात परिवर्तित झाली आहेत, गाई-गोठ्यांचं, जनावरांचं मोठं नुकसान झाले आहे..
गावोगाव लोक डोळ्यांत पाणी आणून आपल्या आयुष्यभराच्या कष्टाने उभारलेल्या शेतजमिनी व घराकडे हतबलपणे पाहत आहेत.. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा हंबरडा ऐकूनही सरकार मुकं राहिलं तर हा बळीराजा त्यांना कधीही माफ करणार नाही असे ते म्हणाले.
शेती उद्ध्वस्त झाली आहे, पिकं नष्ट झाली आहेत, घरदार, संसार, जनावरं पाण्यात वाहून गेली आहेत.. आज बळीराजा अक्षरशः उघड्यावर आला आहे.. आपल्या घामाने, कष्टाने उभं केलेलं पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना त्याच्या डोळ्यातलं पाणी महापुरापेक्षाही जड आहे.ही वेदना केवळ एका शेतकऱ्याची नाही.. एका कुटुंबाची नाही.. तर ही संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांची वेदना आहे..सरकारकडून केवळ पंचनामे आणि आश्वासनं पुरे नाहीत तातडीने ठोस मदत आणि भरीव नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. या संकटात शेतकऱ्यांना आम्ही कधीच एकटे सोडणार नाही.. न्याय मिळवून देण्यासाठी आणि भरीव मदतीसाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असे पाटील म्हणाले.