धाराशिव – समय सारथी
सिना कोळेगाव प्रकल्पच्या पाणलोट क्षेत्रात अहिल्यानगर, आष्टी, कडा, जामखेड, कर्जत या भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सिना कोळेगाव धरणातून तब्बल 1 लाख 4 हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. सिना नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी, नागरिक या सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ/कमी होण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन हे सतर्क असुन जवळपास 3 हजार 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन व NDRF ची पथक अलर्ट मोडवर आहेत.नागरिकांनी काळजी घ्यावी व अडचण असल्यास संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
श्रीमती शोभा जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन तथा निवासी उपजिल्हाधिकारी 94233 41317, श्री रेयैवह डोंगरे, उपविभागीय अधिकारी भूम 95660 96691, ओंकार देशमुख, उपविभागीय अधिकारी धाराशिव 70836 63139, संजय पाटील, उपविभागीय अधिकारी कळंब 96233 23732, दत्तू शेवाळे, उपविभागीय अधिकारी उमरगा 98508 97042, निलेश काकडे, तहसिलदार परंडा 82085 13656, जयवंत पाटील, तहसीलदार भूम 98237 22274, विजय बाडकर ,नायब तहसीलदार परंडा 93592 09119, प्रवीण जाधव, नायब तहसीलदार भूम 82087 91799 यांच्याशी संपर्क साधावा.