धाराशिव – समय सारथी
धाराशिवसह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने पुरस्तिथी आहे, पुरग्रस्तांच्या मदतीला तेरणा ट्रस्ट धावली असुन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ट्रस्टकडुन 51 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. सामाजिक जबाबदारी व संवेदनशीलता दाखवीत मदत केल्याने पाटील परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एकीकडे संकटात असलेल्या शेतकऱ्याला आम्ही 51 लाखांची मदत करतोय, तुम्ही बोलण्यापेक्षा 51 हजारांची तरी मदत करा अशी टिकेची झोड सोशल मीडियावर उठत आहे.
परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून अनेक दानशूर मदतीला पुढे येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव जिल्ह्यातील अनेक नागरिकांच्या आरोग्य सेवेला तत्पर असणाऱ्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केल्यामुळे आपत्तीग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी हातभार लागला जाणार आहे असे पाटील म्हणाले.
धाराशिव जिल्ह्यातील जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना व अतीव नुकसान झालेल्या कुटुंबांना विशेष मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपणही ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी पुढं येऊन आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.