धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव सध्या सुरु असुन दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूर येथे येत आहेत. मुसळधार पावसात रात्री उशिरा धाराशिव पोलिस खडा पहारा देतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पावसात देखील कर्तव्याला प्राधान्य देत असलेले हे पोलिस नवरात्रात जनतेची सेवा करीत आहेत. दिवस रात्र 24 तास बंदोबस्त असुन हातात छत्री घेऊन वाहतूक नियंत्रण करताना दिसत आहेत.
धाराशिव येथील पोलिस अधीक्षक रितु खोकर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना, तुळजापूर उपविभागीय पोलिस अधीक्षक निलेश देशमुख, पोलिस निरीक्षक मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाचे नियोजन केले जात आहे.