शिवसेनेचे कै पवनराजे कोविड सेंटर ठरत आहे रुग्णांसाठी वरदान
2 आठवड्यात 234 रुग्णांवर उपचार – 50 ऑक्सिजन बेड सज्ज
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोना महामारीच्या दुसऱ्या टप्प्यात शिवसेना पक्षाच्या वतीने १२५ बेड्सच्या कै.पवनराजे स्मृती कोविड सेंटर मधिल ५० बेड्सना ऑक्सिजनची सुविधा केलेली कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले असताना जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा कमी पडून रुग्णाला उपचार देणे कठीण झाल्याचे निदर्शनास आल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिकवणीच्या तत्वाच्या आधारावर शिवसेना संपर्क प्रमुख मा.आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संकल्पनेतून शिवसेना पक्षाच्या वतीने ८० टक्के समाजकारणाचे सुत्र मानुन कोरोना महामारीच्या काळात जनतेला मदत व्हावी. या उद्देशाने शिवसेना, पवनराजे फाऊंडेशन यांच्यावतीने तसेच नगरपालिका उस्मानाबाद व इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या सहकार्याने समर्थ मंगल कार्यालय, पवनराजे कॉम्प्लेक्स येथे १२५ बेडचे जम्बो कै.पवनराजे स्मृती कोविड सेंटर मध्ये शहरी व ग्रामीण भागातील वाढत असलेल्या रुग्णांचे प्रमाण पाहता त्यांच्यावर मोफत उपचार व्हावेत हा उद्देश घेऊन हे कोवीड सेंटर सूरु करण्यात आले आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर व आयएमएचे अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख, डॉ. अजय पाटील आदींच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या कोविड सेंटर मध्ये येणाऱ्या रुग्णावर अगदी मोफत उपचार करण्यात येत आहेत. औषधापासुन सर्व खर्च हे कोवीड सेंटर करत आहे. तसेच रुग्णांना तसेच नातेवाईकांना मोफत व आवश्यकतेप्रमाणे पुरेसा मुबलक सकाळी नाष्टा, दोन वेळचे जेवण देण्यात येते.
अगदी चार दिवसात ऑक्सिजन लाईनचे काम पूर्ण करुन 27 एप्रिल पासून हे कोविड सेंटर चालू करण्यात आले आहे. यामध्ये HRCT, Covid profile Blood Test, मोफत करण्यात येतात. रुग्णांचे फिजिकल एक्झरशन होऊ नये म्हणून व्हील चेअरचा वापर वार्डबॉयच्या साहाय्याने कटाक्षाने पाळला जातो. 25 अद्यावत बाथरूमची सोय करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ आर.ओ प्लॅन्ट उभारण्यात आला आहे. येथील उपचारासाठी आयएमएच्या तज्ञ डॉक्टराचे सहकार्य लाभले असुन रुग्णांच्या सेवेसाठी प्रत्येक तीन खाटामागे एक वार्डबॉय व प्रत्यके सहा खाटामागे एक सिस्टर व प्रत्येक 20 खाटामागे एक वैद्यकीय अधिकारी याप्रमाणे दिवसरात्र 16 डॉक्टर्स, 2 फिजिशियन, 5 लॅब टेकनिशन, 5 मेडिकल स्टाफ, 50 नर्स स्टाफ, 12 सुरक्षा रक्षक, 10 सफाई कर्मचारी, 40 वार्ड बॉय, 20 स्वयंसेवक व पवनराजे फाउंडेशन चे कर्मचारी उत्स्पुर्तपणे सेवा देत आहेत. येथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सेंटर मध्ये उपचार घेण्यासाठी रुग्णांची तसेच नातेवाईकांची ये जा होत असते. त्या पार्श्वभूमीवर कोरोना पासुन सुरक्षित करण्यासाठी नगरपालिका उस्मानाबाद यांच्या वतीने परिसरात दररोज जंतुनाशक सेनीटायझर फवारणी करण्यात येते. कोविड सेंटर मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर, डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर व आयएमएचे अध्यक्ष डॉ.सचिन देशमुख व डॉ.अजय पाटील हे लहान सहान गोष्टीवर लक्ष ठेऊन काम पाहत आहेत.
27 एप्रिल पासून जनतेच्या सेवेत असलेल्या सेंटर मध्ये आज पर्यंत 238 रुग्ण उपचारासाठी आले. यापैकी 90 रुग्णांनी ऑक्सीजन बेड वरती उपचार घेऊन बरे झाले आहेत व 35 रुग्ण साध्या बेडवरती उपचार घेऊन बरे झाले आहेत तसेच 34 पेशेंट जिल्हा सामान्य रुग्णालय व खाजगी रुग्णालयास रेफर केले, तर 125 रुग्णांवर व्यवस्थित उपचार घेऊन त्यांना घरपोच डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या कोविड सेंटर मध्ये 100 पेशेंट उपचार घेत आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण असल्याने मोठी अडचण निर्माण होत होती त्यामुळे १२५ बेड्सच्या कै. पवनराजे स्मृती कोविड सेंटर मधिल ५० बेड्सना ऑक्सिजनची व 6 ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटरच्या सहाय्याने केलेली सुविधा कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. सदरील कोवीड सेंटरमध्ये मुखीम सिध्दीखी हे व्यवस्थापक, ऑक्सिजनचे व्यवस्थापन मंगेश नायगावकर, नाष्टा व जेवणाची सोय सतीश शिंदे, बेड व स्टाफचे नियोजन फिरोज शेख तर मेडीकल व शासकीय जिल्हा रुग्णालय संपर्क प्रमुख म्हणून प्रविण इंगळे काम पाहत आहेत.
नागरीकांनी कोवीडचे कोणतेही लक्षण अंगावर न काढता तातडीने तपासणी करुन वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सूरु करावेत असे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.