सार्थ निवड – उस्मानाबाद विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी अध्यक्षपदी अमित शिंदे
गाव व वॉर्ड तिथे शाखा उपक्रम राबविणार – पक्ष बांधणीला प्राधान्य
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे युवा नेते अमित शिंदे यांची सार्थ निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी ही निवड केली असून याबाबत राष्ट्रवादी पक्षाने झुम मिटींग आयोजित केली होती या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री संजय बनसोडे, पक्ष निरीक्षक तथा राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यासह इतर पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
अमित शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून युवक जिल्हाध्यक्षसह विविध पदावर एकनिष्ठपणे काम करीत पक्ष बांधणी व वाढीत महत्वाचे कार्य केले आहे. शिंदे यांनी यापूर्वी उस्मानाबाद नगर परिषदेचे माजी आध्यक्ष असताना अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले होते तसेच अनेक समाज उपयोगी व पक्षीय कामात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यांनी त्यांच्या प्रभागासह शहरात अनेक विकासकामे मार्गी लावली असल्याने त्यांची युवा वर्गात वेगळी ओळख आहे. या निवडी बद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. राजकारण बरोबरच ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून परिचित आहेत.
उस्मानाबाद विधानसभा मतदार संघाचा दौरा करून गाव व वॉर्ड तिथे राष्ट्रवादी शाखा सुरू करण्याचा व त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. विविध प्रश्न राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी भर देणार असल्याचे ते म्हणाले.