2 दिवस लसीकरण बंद – 15 व 16 मे ला कोरोना लसीकरण नाही
केंद्रावर येऊ नका – जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आवाहन
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 15 व 16 मी रोजी कोरोना लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले नसून एकही केंद्रावर लस दिली जाणार नाही त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घेऊन लसीकरण केंद्रावर येऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
कोविशील्ड लसीचा दुसरा डोस देण्याकरिता पहिला डोस घेतल्यानंतर किमान 12 आठवड्याचे म्हणजे 84 दिवसांचे अंतर ठेवण्याबाबत भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने कोविन पोर्टलवर काही बदल पुढील 2 दिवसांमध्ये होणार आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात 15 व 16 मे शनिवार व रविवारी कोठेही कोविड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आलेले नाही त्यामुळे नागरिकांनी केंद्रावर येऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. कोविन पोर्टलवरील बदल पूर्ण होताच पुढील लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.