9 दिवसांचा जनता कर्फ्यु – उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 15 मे सकाळी 7 ते 24 मे सकाळी 7 वाजेपर्यंत असा 9 दिवसांचा जनता कर्फ्यु आदेश जारी केले आहेत. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आस्थापना बंद राहणार असून लोकांना विनाकारण बाहेर फिरण्यास बंदी असणार आहे.
14 मे सकाळी 7 ते 24 मे सकाळी 7 या 9 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे आदेशीत केले आहे अत्यावश्यक सेवेत दवाखाने, लसीकरण, औषधी दुकाने, टॅक्सी ऑटोरिक्षा व सार्वजनिक बसेस वाहतूक, मालवाहतूक, पाणी पुरवठा सेवा, एटीएम,विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा या सुविधा पूर्णवेळ तर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पपं हे सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत व कृषी विषयक सेवा देणाऱ्या आस्थापना सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहतील. या 9 दिवसांच्या जनता कर्फ्यु काळात भाजीपाला , फळ विक्री , किराणा दुकान , बेकरी व इतर आस्थापना दुकाने बंद राहतील.
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या दररोज 600 ते 800 रुग्ण सापडत असून 10 ते 15 जणांचा मृत्यू होते आहे. यापूर्वी 8 मे ते 13 मे या काळात 6 दिवसांचा जनता कर्फ्यु लागू केला होता मात्र ईद निमित्त 12 मे ला एक दिवसाची जीवनावश्यक सेवांना सूट देण्यात आली होती.
वाढता कोरोना प्रादुर्भाव – पंतप्रधान मोदी साधणार उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद
भाजीपाला अन् किराणा दुकान बंद ठेवले तर खायचं काय, हे सामान्य जनतेला मान्य नाही
हे lockdown करुन तुम्ही काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत हेच समजत नाही
Multistate chalu rahtil ka
अत्यावश्यक सेवेत किराणा,भाजीपाला येतो की नाही ,काहीच कळत नाही
ज्या लोकांना रोज काम केल्याशिवाय खायला भेटत नाही अशा लोकांनी काय करावं
किराणा कसा भराव ,
ते रोज पैसे कुटून अनार सर……