धाराशिव/परंडा – समय सारथी , किरण डाके
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरजन्य स्तिथी असुन भुम तालुक्यातील अनेक भागात पुराच्या पाण्यात नागरिक अडकले आहेत. साकत, लाखी या भागात पुरात अडकलेल्या हेलिकॉप्टरद्वारे एअरलिफ्ट करून सुखरूप ठिकाणी पोचवले जात आहे. नागरिकांना मदतीच्या सूचना प्रशासनाला, जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमला देखील संपर्क साधून आवश्यक त्या उपाययोजनांबाबत विनंती केली आहे.
आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत हे पुण्याहून नागरिकांच्या मदतीसाठी निघाले असुन त्यांनी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर व्यवस्था केली आहे. काही जणांना बाहेर सुद्धा काढले आहे. लाखी येथील महापुरात अडकलेल्या सर्व नागरिकांना हेलिकॉप्टर व बोट याद्वारे बचावकार्य केलं आहे. हेलिकॉप्टर आत्ता रुई, ढगपिंपरी, वडनेर-देवगाव व वागेगव्हाण येथे बचावकार्य करण्यासाठी गेले आहे.
कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास तात्काळ कळवावी. मी नागरिकांशी सतत संवाद साधत असून, यंत्रणा प्रत्येकाच्या मदतीसाठी सज्ज आहेत. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. 9970946810,9104252525 आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्या, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.