धाराशिव – समय सारथी
छत्रपती संभाजीनगर महसूल विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर हे 22 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. विविध विभागाच्या आढावा बैठकीसह ते कार्यक्रमाना उपस्थितीत राहतील. विविध विभागानी केलेली कामे, राबवलेल्या शासकीय योजना यांची माहिती, प्रलंबित कामे याचा ते जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या सोबत आढावा घेतील. त्यांच्या बैठकी व दौऱ्याची प्रशासनाने तयारी केली आहे. बैठकीला अधिकारी, विभाग प्रमुख हजर राहणार आहेत.