धाराशिव – समय सारथी
दारू पिण्यासाठी पैसे देण्याच्या कारणावरून मारहाण करून खुन केल्या प्रकरणी 3 आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा व प्रत्येकी 11 हजार दंडाची शिक्षा धाराशिव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस आवटे यांच्या कोर्टाने सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास व जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तिवाद महत्वाचा ठरला.
महिंद्रा पिकमध्ये आरोपी हे ढोकी येथुन धाराशिवकडे येत असताना ढोकी येथुन मयत कृष्णा कोरे हा पॅसेंजर म्हणून बसला व धाराशिवकडे येत असताना आरोपी यांनी आळणीपाटी चौकात मयत कृष्णा कोरे यास पिकअप मध्ये पाठीमागील बाजुस बसवले व त्यावेळी आरोपी हे मयत कृष्णा कोरे यास दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करत असताना कृष्णा कारे याने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी लोखंडी टॉमीने मयतास मारहाण केली. पैसे घेऊन दारू पिली व त्यानंतर गळा आवळून खुन केला व पुरावे नष्ट केले. आई वडिलांचा डीएनए आधारे ओळख पटवण्यात आली.
आरोपीनी मयताचे अंगावरील कपडे काढुन त्यास नग्न करून सर्व साहित्य सोबत घेवुन मयत कृष्णा कोरे हयास तेथेच सोडुन निघुन गेले व जाताना आळणी पाटी ते ढोकी रस्त्यावर सर्व साहित्य रोडच्या कडेला टाकून दिले. तपासामध्ये सर्व साहित्य जप्त करण्यात आले तसेच, हॉटेल मेघदूत येथिल मॅनेजरचे/मालकाचा, वेटरचा जवाब नोंदविण्यात आला तसेच तेथिल सी.सी.टी.व्ही. फुटेज जप्त करण्यात आले व हॉटेल मालकाचे बँक खात्याचे डिटेल घेण्यात आले व रिक्षा चालकाचा जवाब नोंदविण्यात आला.
पोलिस निरीक्षक तानाजी दराडे, ए. टी. चिंतले, डी. बी. पारेकर पोलिस निरीक्षक, बी. के. बलय्या, सहा. पोलिस निरीक्षक आणि प्रविणकुमार बांगर, पोलिस निरीक्षक यांनी तपासकरुन दोषारोपपत्र मा. न्यायालयात सादर केले. कोर्ट पैरवी म्हणुन तर्फेवाड यांनी काम पाहीले.
सदर प्रकरणामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने महेंद्र बी. देशमुख जिल्हा सरकारी वकील तथा शासकिय अभियोक्ता, धाराशिव यांनी एकुण 27 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सदर प्रकरणामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने दिलेला पुरावा व ऍड देशमुख यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून धाराशिव येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एस आवटे यांनी शिक्षा सुनावली.
आरोपी रमेश भगवान मुंडे रा. कोयाळा ता. धारूर जि. बिड, शिवशंकर हरीभाउ इंगळे रा. इंगळे वस्ती केज ता. केज जि. बिड आणि अमोल अशोक मुंडे रा. कोयाळा ता. धारूर जि. बिड यांना कृष्णा शिवशंकर कोरे याचा खून केल्याबद्दल व पुरावा नष्ट केल्याबद्दल कलम 302,201 अन्वये दोषी ग्राहय धरुन जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 11 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 11 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.