धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.पाठक यांनी दैनिक सकाळसह अन्य वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले होते. त्याचे अनेक सामाजिक विषयावर केलेले लिखाण राज्यभर गाजले होते, मराठवाड्यातील ज्येष्ठ पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. धाराशिव येथील पत्रकार यांच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो !
दुपारी 1 वाजता त्यांच्या पार्थिव देहावर कपिलधार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.