21 मे उद्या कोविशिल्डचा पहिला डोस मिळणार तर 22 मे कोव्हॅकसीनचा दुसरा डोस
49 लसीकरण केंद्रावर 7770 डोसचे दिले जाणार
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील 49 लसीकरण केंद्रावर उद्या 21 मे रोजी शुक्रवारी सकाळी 9 ते सांयकाळी 5 या वेळेत 7 हजार 770 कोविशिल्ड लसीचे डोस दिले जाणार आहेत. 45 वर्षवरील नागरिक,आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी दिली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील 36 उपकेंद्रावर प्रत्येकी 150, नागरि प्राथमिक आरोग्य केंद्र वैराग रोड येथे 130, पोलीस रुग्णालयात केवळ फ्रंट लाईन वर्करसाठी 260,ग्रामीण रुग्णालय मुरूम 110, लोहारा 150, सास्तुर 150, तेर 140, वाशी 100, भूम 130, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर 100,कळंब 190,परंडा 270,शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय 240,जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे 400 डोस दिले जाणार आहेत. या लसीकरण मोहिमेसाठी ऑनलाइन नोंदणी किंवा बुकिंग करण्याची आवश्यकता नसून लसीकरण केंद्रात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल व उपलब्द लसीनुसार टोकन दिले जातील त्यामुळे केवळ पात्र नागरिकांनी लसीकरणसाठी यावे व इतर नागरिकांनी विनाकारण गर्दी टाळत सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.
22 मे रोजी 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना, आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर यांना कोव्हॅकसीन लसीचा दुसरा डोस 7 लसीकरण केंद्रवर सकाळी 9 ते सांयकाळी 6 या वेळेत दिला जाणार आहे. यात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र उस्मानाबाद येथे केवळ फ्रंट लाईन वर्करसाठी 300 डोस, ग्रामीण रुग्णालय भूम 360,वाशी 320,तेर 190,मुरूम 150, लोहारा 150 व सास्तुर येथे 130 डोस दिले जाणार आहेत. हा डोस देताना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.