दिलासा – कोरोना चाचणीत वाढ तरी रुग्ण संख्या होतेय कमी
आज 392 रुग्ण तर 595 रुग्ण उपचारनंतर बरे
पहा गेल्या 10 दिवसांची कोरोना स्तिथी – सोमवारपासून जीवनावश्यक सेवा सुरू
उस्मानाबाद : समय सारथी
उस्मानाबाद जिल्हावासीयांसाठी दिलासा देणारी बाब असून गेल्या 10 दिवसात कोरोना चाचणीत वाढ झाली तरी रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. आज 23 मे रविवारी 392 रुग्ण तर 595 रुग्ण उपचारनंतर बरे झाले तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे त्यापैकी 9 जणांचे मृत्यू हे काही दिवसांपूर्वी झाले असून ते परजिल्हा उपचार घेताना झालेले आहेत. गेल्या 10 दिवसांची कोरोना स्तिथी पहिली तर आकडा बऱ्यापैकी कमी झाला आहे त्यामुळे दिलासा म्हणावा लागेल मात्र सोमवार पासून जीवनावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 सुरू होणार असल्याने आगामी काळात नियमांचे पालन केले तर संसर्ग रोखणे शक्य होणार आहे. उस्मानाबाद लॉकडाउन काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने संसर्ग रोखण्यास प्रशासनाला यश आले म्हणावे लागेल. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 4 हजार 456 सक्रीय रुग्ण आहेत त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. रॅपिड तपासणीत रुग्ण सापडण्याची टक्केवारी गेल्या 10 दिवसात 22 टक्के वरून 12 टक्केवर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के जवळपास गेले असून ते 89.23 टक्के आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्गचा आकडा कमी झाला असल्याचे रॅपिड अँटीजन तपासणी व त्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या पाहिली तर लक्षात येते. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांची रॅपिड अँटीजन तपासणी आकडेवारी पाहिली तर 14 मे ला 1 हजार 603 चाचणी करण्यात आल्या त्यात 355 रुग्ण म्हणजे 22.14 टक्के रुग्ण सापडले तर 15 मे ला 2 हजार 361 रॅपिड करण्यात आल्या त्यात 448 म्हणजे 18.97, 16 मे ला 1 हजार 423 पैकी 273 म्हणजे 19.18, 17 मे ला 2 हजार 304 पैकी 447 पॉझिटिव्ह म्हणजे 19.40 टक्के, 18 मे 1 हजार 963 पैकी 326 म्हणजे 16.61, 19 मे रोजी 1 हजार 842 पैकी 348 म्हणजे 18.89, 20 मे रोजी 2 हजार 2 हजार 612 पैकी 458 म्हणजे 17.53 टक्के, 21 मे रोजी 2 हजार 915 पैकी 407 म्हणजे 13.96, 22 मे रोजी 3 हजार 387 पैकी 483 महजे 14.26 टक्के तर 23 मे रोजी 2 हजार 552 पैकी 304 रुग्ण म्हणजे 11.91 टक्के पॉझिटिव्ह आले. गेल्या 10 दिवसात 22 हजार 961 रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आल्या त्यापैकी 3 हजार 849 रुग्ण पॉझिटिव्ह आले म्हणजे 16.76 टक्के पॉझिटिव्ह आले ही बाब काही प्रमाणात नक्कीच दिलासा देणारी आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संसर्ग असताना अनेक नागरीक अजूनही मास्क न घालता फिरत आहेत त्यांनी स्वयंशिस्त लावुन घेणे गरजेचे आहे. ब्रेक द चैन काळात व शनिवार रविवारी जनता कर्फ्यु काळात उस्मानाबाद शहरातील अनेक चौकात, ठिकाणी पोलीस बंदोबस्त व तपासणी होत होती यामुळे गर्दीवर काही प्रमाणात आळा बसला. रुग्ण सापडणे संख्या कमी झाली म्हणजे संकट टळले नाही. कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे
जेणेकरून मृत्यू टाळता येऊ शकतो , नागरिकांनी काळजी घेण्याचे व तात्काळ उपचार घेण्याचे आवाहन सतत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर करत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात आज रॅपिड तपासणीत 304 रुग्ण व आरटीपीसीआर चाचणीत 88 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.आज 2 हजार 552 रॅपिड तपासणी करण्यात आल्या त्यात 304 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. आज 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून *कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या आता 1182 झाली आहे*.
*उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 2 लाख 79 हजार 951 नमुने तपासले त्यापैकी 52 हजार 369 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 18.70 टक्के आहे. जिल्ह्यात 46 हजार 731 रुग्ण बरे झाले असून 89.23 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 1182 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.25 टक्के मृत्यू दर आहे*.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 102 रुग्ण , तुळजापूर 51, उमरगा 49, लोहारा 50, कळंब 56, वाशी 33, भूम 22 व परंडा तालुक्यात 29 रुग्ण सापडले आहेत
उस्मानाबाद जिल्ह्यात 24 मे सोमवार पासुन ब्रेक द चैन मोहिमेत अत्यावश्यक सेवेबरोवरच जीवनावश्यक बाबींना सूट देण्यात आली असून सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
जीवनावश्यक सेवेत सर्व किराणा दुकाने, भाजीपाला , फळ, दूध संकलन व वितरण, सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ दुकाने यात बेकरी, मिठाई , चिकन , मटण, पोल्ट्री, मासे व अंडी दुकाने यांचा समावेश असून घरपोच सेवा अपेक्षित आहे. रेस्टरट बार व हॉटेल यांना घरपोच सेवा देत येईल.पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकाने , सर्व पेट्रोल पंप सुरू राहतील या दुकानांना 11 नंतर घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी असणार नाही. राष्टीयकृत खासगी सहकारी बँका पोस्ट ऑफिस व कृषी विषयक दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरू राहतील. दर शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यु असेल व वरील आस्थापना वगळता अन्य दुकाने मात्र बंद असतील.
कोरोनाचा आलेख पहा –
दिनांक – रुग्ण – मृत्यू – उस्मानाबाद तालुका
1 मार्च – 09 रुग्ण – 00 मृत्यू
2 मार्च – 40 रुग्ण – 01 मृत्यू
3 मार्च – 16 रुग्ण – 00 मृत्यू
4 मार्च – 45 रुग्ण – 02 मृत्यू
5 मार्च – 26 रुग्ण – 00 मृत्यू
6 मार्च – 30 रुग्ण – 00 मृत्यू
7 मार्च – 49 रुग्ण – 00 मृत्यू
8 मार्च – 16 रुग्ण – 01 मृत्यू
9 मार्च – 38 रुग्ण – 01 मृत्यू
10 मार्च – 24 रुग्ण – 00 मृत्यू
11 मार्च – 58 रुग्ण – 00 मृत्यू
12 मार्च – 27 रुग्ण – 01 मृत्यू
13 मार्च – 54 रुग्ण – 00 मृत्यू
14 मार्च – 69 रुग्ण – 00 मृत्यू
15 मार्च – 52 रुग्ण – 00 मृत्यू
16 मार्च – 123 रुग्ण – 01 मृत्यू
17 मार्च – 94 रुग्ण – 00 मृत्यू
18 मार्च – 164 रुग्ण – 00 मृत्यू
19 मार्च – 119 रुग्ण – 00 मृत्यू
20 मार्च – 125 रुग्ण – 00 मृत्यू
21 मार्च – 118 रुग्ण – 01 मृत्यू
22 मार्च – 173 रुग्ण – 00 मृत्यू
23 मार्च – 130 रुग्ण – 00 मृत्यू
24 मार्च – 176 रुग्ण – 00 मृत्यू
25 मार्च – 174 रुग्ण – 00 मृत्यू
26 मार्च – 155 रुग्ण – 02 मृत्यू
27 मार्च – 224 रुग्ण – 00 मृत्यू
28 मार्च – 184 रुग्ण – 00 मृत्यू
29 मार्च – 239 रुग्ण – 00 मृत्यू
30 मार्च – 242 रुग्ण – 00 मृत्यू
31 मार्च – 253 रुग्ण – 02 मृत्यू
1 एप्रिल – 283 रुग्ण – 04 मृत्यू
2 एप्रिल – 292 रुग्ण – 00 मृत्यू
3 एप्रिल – 343 रुग्ण – 02 मृत्यू
4 एप्रिल – 252 रुग्ण – 00 मृत्यू
5 एप्रिल – 423 रुग्ण – 02 मृत्यू
6 एप्रिल – 415 रुग्ण – 08 मृत्यू
7 एप्रिल – 468 रुग्ण – 05 मृत्यू
8 एप्रिल – 489 रुग्ण – 02 मृत्यू
9 एप्रिल – 564 रुग्ण – 00 मृत्यू
10 एप्रिल – 558 रुग्ण – 07 मृत्यू
11 एप्रिल – 573 रुग्ण – 03 मृत्यू
12 एप्रिल – 680 रुग्ण – 05 मृत्यू
13 एप्रिल – 590 रुग्ण – 07 मृत्यू
14 एप्रिल – 613 रुग्ण – 15 मृत्यू
15 एप्रिल – 764 रुग्ण – 10 मृत्यू
16 एप्रिल – 580 रुग्ण – 23 मृत्यू
17 एप्रिल – 653 रुग्ण – 20 मृत्यू
18 एप्रिल – 477 रुग्ण – 16 मृत्यू
19 एप्रिल – 662 रुग्ण – 10 मृत्यू
20 एप्रिल – 645 रुग्ण – 21 मृत्यू
21 एप्रिल – 667 रुग्ण – 23 मृत्यू
22 एप्रिल – 719 रुग्ण – 21 मृत्यू
23 एप्रिल – 719 रुग्ण – 16 मृत्यू
24 एप्रिल – 810 रुग्ण – 20 मृत्यू
25 एप्रिल – 569 रुग्ण – 16 मृत्यू
26 एप्रिल – 720 रुग्ण – 17 मृत्यू
27 एप्रिल – 728 रुग्ण – 05 मृत्यू
28 एप्रिल – 872 रुग्ण – 11 मृत्यू
29 एप्रिल – 783 रुग्ण – 18 मृत्यू
30 एप्रिल – 900 रुग्ण – 19 मृत्यू
==================
1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू
3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू
4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू
5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू
6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू
7 मे – 660 रुग्ण – 08 मृत्यू
8 मे – 629 रुग्ण – 11 मृत्यू
9 मे – 712 रुग्ण – 08 मृत्यू
10 मे – 833 रुग्ण – 14 मृत्यू
11 मे – 676 रुग्ण – 11 मृत्यू
12 मे – 569 रुग्ण – 13 मृत्यू
13 मे – 623 रुग्ण – 08 मृत्यू
14 मे – 458 रुग्ण – 15 मृत्यू
15 मे – 607 रुग्ण – 12 मृत्यू
16 मे – 492 रुग्ण – 09 मृत्यू
17 मे – 547 रुग्ण – 07 मृत्यू
18 मे – 400 रुग्ण – 11 मृत्यू
19 मे – 449 रुग्ण – 08 मृत्यू
20 मे – 534 रुग्ण – 11 मृत्यू
21 मे – 514 रुग्ण – 08 मृत्यू
22 मे – 577 रुग्ण – 11 मृत्यू
23 मे – 392 रुग्ण – 12 मृत्यू