कोरोनाचे थैमान – 24 तासात पंरडा तालुक्यात दहा रुग्णांचा बळी
पंरडा – समय सारथी ( बालाजी बोराडे )
पंरडा तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे, तालुक्यात पहिल्यांदाच 24 तासांमध्ये 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे. मृत रुग्णामध्ये पंरडा येथील 38 वर्षीय पुरुष, पाचपिपंळा येथील 70 वर्षीय स्त्री,पांढरेवाडी येथील 70 वर्षीय स्त्री, सोनारी येथील 45 वर्षीय स्त्री,तादुळंवाडी येथील 46 वर्षीय स्त्री,पिपंरखेड येथील 50 वर्षीय पुरुष, चिंचपूर येथील 85 वर्ष पुरुष, तादुळंवाडी येथील 77 वर्षीय पुरुष,पांचपिपळा येथील 60 वर्षीय स्त्री, वडनेर येथील 60 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
आतापर्यंत पंरडा तालुक्यात 3936 रुग्ण आढळून आले आहेत त्यापैकी 3515 रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत तर 299 रुग्ण उपचार घेत आहेत.
सध्या परंडा शहरामध्ये गर्दी भरपूर प्रमाणात होत असून स्थानिक प्रशासन,महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
ग्रामीण भागातील लोकांनी जास्तीत जास्त टेस्ट करून घ्याव्यात,जनतेने अंगावर कुठल्याही प्रकारचा आजार , लक्षणे जास्त दिवस काढु नये, ग्रामीण भागामध्ये लसीकरण वाढविण्यात आलेले आहे.
डॉ जहुर सय्यद ( तालुका आरोग्य अधिकारी परंडा )