धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत तुळजाभवानी देवीच्या दर्शन दारात वाढ करण्यात आली असुन हे दर दुप्पट झाले आहेत.
देणगी दर्शन 500 रुपयाचा पास आता 1 हजार रुपयाला तर 200 रुपयाचा पास 300 रुपयाला झाला आहे. स्पेशल गेस्ट देणगी दर्शन 200 रुपयांचा पासही 500 रुपयाला झाला आहे. दर्शनासोबत अभिषेक पूजेचेही दर 300 रुपयांवरून 400 रुपये वाढले आहेत. 20 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार आहेत.
नवरात्र महोत्सव सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर मंदिर संस्थानने नवे दर प्रसिद्धी पत्रक काढून जाहीर केले आहेत. दर कुठल्या कारणामुळे वाढवले व का वाढवले याची कल्पना नसल्याने गोंधळाची स्तिथी आहे.