धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून भावी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ज्योती ताई धनंजय सावंत यांची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीतील शिवसेना व भाजपने अध्यक्षपदाचा उमेदवार यानिमित्ताने जाहीर केला आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर कही खुशी, कही गम अशी स्तिथी आहे. भाजपने जल्लोष करीत माऊली अध्यक्ष होणार, लागा तयारीला… असे म्हणत अर्चना ताई पाटील फिरसे असा नारा दिला आहे. एकंदरीत पाटील व सावंत असा सामना महायुतीत पाहायला मिळणार आहे.