धाराशिव – समय सारथी
धाराशिवच्या राजकारणात शाब्दिक हल्ले प्रतिहल्ले सुरु आहेत. खासदार ओमराजे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेनाचा गट सक्रीय झाला असुन ‘बालबुद्धी’ अशी उपमा देत गंजुट्या मालकाचे आदेश अन गुलामांच्या पोस्ट ! तिन्ही पिढ्यांच्या कारनाम्याचे …… उपलब्ध आहेत, असा सुचक इशारा दिला आहे. डॉ पद्मसिंह पाटील, राणाजगजीतसिंह पाटील व मल्हार पाटील या तिन्ही पिढ्यावर टीकास्त्र सोडले आहे. कारनामा काय आणि उपलब्ध काय हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे
धन्यवाद.. खा ओम.. आम्हाला कळालं.. अश्या आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर करण्यात आल्या आहेत. आम्हाला सगळं कळालं.. असे यात नमुद आहे मात्र काय कळाले हे गुलदस्त्यात ठेवले आहे. काय कळाले यावरून आता पुन्हा एकदा राजकीय कुस्ती रंगली आहे. सगळं कसं कोड्यात असले तरी तर्क लावत त्याची उत्सुकता निर्माण केली आहे.
तुम्हालाही कळेल ! धन्यवाद खासदार.. असे म्हणत भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या टीमने शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर निशाण्यावर आहेत. ‘बाळा’ नंतर ‘आम्हाला कळालं’ हा नवीन अध्याय सुरु झाल्याने राजकारण तापले असुन उत्सुकता ताणली आहे.
दया कुछ तो गडबड है.. कहना क्या चाहते हो.. अश्या प्रतिक्रिया उमटत आहेत. बाळा… नादी लागु नको, रडवीन व बडवीन यानंतर आता हा नवीन अध्याय सुरु झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासुन भाजप व शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात सुप्त व उघड संघर्ष पहायला मिळत आहे, सोशल मीडियावरून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.