धाराशिव – समय सारथी
साहेब… म्हणजे कर्तृत्वाचं आभाळ ! थकायचं, झुकायचं तर अजिबात नाय… असे म्हणत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी डॉ पद्मसिंह पाटील यांच्या बाबतीत एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आहे. डॉ पाटील व राणाजगजीतसिंह पाटील पिता पुत्रातील भावनिक नात्यांचा क्षण या व्हिडिओमध्ये असुन राणाजगजीतसिंह पाटील हे डॉ पाटील यांची काळजी घेताना दिसत आहेत, ते स्वतः सारथी बनून गाडी चालवून वडिलांना सफर घडवून आणत आहेत. पापा मेरी जान असे गाणं ठेवत त्यांनी पिता पुत्राचे प्रेम व भावना व्यक्त केल्या आहेत.
साहेब… म्हणजे कर्तृत्वाचं आभाळ ! या आभाळानंच तर शिकवलंय थकायचं नाय, झुकायचं तर अजिबात नाय. आपल्या भागासाठी, आपल्या लोकांसाठी छातीचा कोट करून लढत राहायचं. ही संस्काराची शिदोरीच आयुष्याचं संचित आहे. आपण दिलेला हा समृद्ध अन् सक्षम वारसा प्राणपणानं जपत राहणार. आपल्या माणसांच्या सेवेसाठी साहेबांचे आशीर्वाद कायम सोबत आहेतच, असे त्यांनी पोस्टमध्ये शेअर केले आहे.