धाराशिव – समय सारथी
खरीप 2020 संभाजीनगर उच्च न्यायालयात 10 सप्टेंबरला सुनावणी तर खरीप 21 ची उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण कधीही निकाल येऊ शकतो अशी माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली आहे. खरीप 2021 साठी बजाज अलायन्स पिक विमा कंपनीने केंद्र शासनाच्या परिपत्रकाचा आधार घेत केवळ 50 टक्केच रक्कम वाटप केली त्याविरुद्ध देखील मी स्वतःच्या नावे जनहित याचिका दाखल केली आहे याचिकेची सुनावणी पूर्ण झाली असून कुठल्याही क्षणी निकाल येऊ शकतो.
बजाज अलायन्स पिक विमा कंपनी विरुद्धची ही दोन्ही प्रकरणे असून खरीप 2020 च्या प्रकरणात उच्च न्यायालयाने लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले असून आत्तापर्यंत 376 कोटी रुपये वाटप झाले असून जवळपास 225 कोटी रुपयांसाठी आता अंतिम निकाल येणे बाकी आहे.या दोन्ही प्रकरणाची धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना माहिती व्हावी या उद्देशाने जगताप यांनी ही माहिती दिली.