धाराशिव – समय सारथी
देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार, असा निर्धार राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईकांनी व्यक्त केला होता त्यानुसार त्यांनी आज 5 सप्टेंबर रोजी टेस्लाची कार खरेदी केली. ही कार त्यांनी स्वतःसाठी, मुलासाठी नव्हे तर नातवासाठी खरेदी केली आहे.
भारतातील सर्वात पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली, याचा मला अभिमान आहे. महत्वाचे म्हणजे ही टेस्ला कार कोणतेही डिस्काऊंट न देता पूर्ण पैसे भरून मी विकत घेतली आहे, अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली. तसेच टेस्लाची ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या नातवाला देत आहे, कारण तो शाळेत ही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरणपूरक कारचा संदेश देईल, असं प्रताप सरनाईक म्हणाले. जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून टेस्ला ओळखली जाते.भारतात 15 जुलै रोजी दिमाखात टेस्ला कार दाखल झाली. 15 जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे टेस्लाचे शोरुम लॉन्च करण्यात आला. यानंतर आजपासून टेस्लाची गाडी वितरित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. देशातील टेस्लाची पहिली कार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी खरेदी केली.
टेस्ला कंपनीची 3 RWD या मॉडेलची कार अवघ्या 5.6 सेकंदात शून्य ते 100 इतका वेग गाठू शकते. Tesla 3 LR RWD ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 622 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करु शकते. टेस्लाची स्टॅटर्ड RWD व्हर्जनची कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करू शकते. नवीन Model Y मध्ये बाह्य व आतील रचनेत बदल करण्यात आले असून, आता मागील सीटसाठी स्वतंत्र टचस्क्रीन आणि इलेक्ट्रिक अडजस्टेबल फंक्शनदेखील देण्यात आले आहेत. Model Y ही टेस्लाची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे आणि जगभरातही ती सर्वोच्च विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक आहे. Model Y ची स्पर्धा BMW X1 LWB, Volvo C40, BYD Sealion 7, 3I Mercedes-Benz EQA यांच्याशी होणार आहे. भारतात ही कार पूर्णपणे आयात (CBU) करून आणली जात असल्यामुळे किंमतीत व झालेली आहे.