कोरोना लसीकरण – 19 जुनला मिळणार 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस
10 लसीकरण केंद्रावर व्यवस्था – कोविशिल्डची ऑनस्पॉट लस मिळणार
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोना लसीकरण मोहीम अंतर्गत 19 जुन शनिवारपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 10 लसीकरण केंद्रावर व्यवस्था करण्यात आली असून या नागरिकांना कोविशिल्डची लस ऑनस्पॉट पद्धतीने मिळणार आहे यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची गरज नाही अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी दिली.
30 ते 44 वयोगटातील लाभार्थ्याकरिता कोविड लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये दहा ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले यात 9 प्राथमिक आरोग्य केंद्र व उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयाचा समावेश आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी,समुद्रवाणी, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग,उमरगा तालुक्यातील नाईचाकूर, लोहारा तालुक्यातील माकणी,कळंब तालुक्यातील दहिफळ,वाशी तालुक्यातील पारा,भूम तालुक्यातील पाथरूड, परंडा तालुक्यातील जवळा या ठिकाणी प्रत्येकी 150 तर जिल्हा शासकीय रुग्णालयात 300 डोस दिले जाणार आहेत.लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्यास टोकन देऊन प्राधान्य दिले जाणार असून नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे