भाजपला क्लिन चीट – कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही
:-राणाजगजितसिंह पाटील
माझे वयक्तिक अनुभव चांगले , उस्मानाबादच्या जनतेने अनेक गोष्टी पाहिल्यात निष्कर्ष काढू शकतात
उस्मानाबाद – समय सारथी
भाजप पक्षाबाबत माझे वयक्तिक अनुभव चांगले आहेत , माझे अनुभव सगळ्यांना माहीत आहेत. गेल्या 10-15 वर्षातील अनुभव काढले तर ते लक्षात येतील. उस्मानाबादच्या जनतेने अनेक गोष्टी पहिल्या आहेत त्यावरून निष्कर्ष काढता येईल, भाजपने सत्तेचा कधीही दुरुपयोग केला नाही असे सांगत भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाजपला क्लिन चीट दिली. भाजप सत्तेचा वापर करीत केंद्रीय व राज्य तपास यंत्रणेच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेच्या राजकीय नेत्यांना त्रास देणे व सत्ता परिवर्तनासाठी दबाव टाकत असल्याचे आरोप होत असताना आमदार पाटील हे भाजपच्या बाजूने उभे राहिले आहेत.
राज्याचे गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील व त्यांचे पुत्र माजी राज्यमंत्री राणाजगजीतसिंह पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी पक्षात होते मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता. अनेक वर्षे शरद पवार यांचे विश्वासू मानला जाणाऱ्या पाटील परिवाराने भाजप प्रवेश केल्यानंतर त्यामागे अनेक कारणे व दबाव असल्याचा तर्कवितर्क काढले जात होते. भाजप बाबत माझे अनुभव चांगले असुन आता भाजपवर होत असलेले आरोप चुकीचे असल्याचे आमदार पाटील म्हणाले. भाजपने कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही असा माझा व्यक्तीक अनुभव आहे असे ते म्हणाले.
शिवसेना काही तरी चुकीचे करते असे अगदी सुरुवातीपासून भाजपचे म्हणणे आहे. शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असुन त्यांनी सत्ता स्थापनेत एकत्रीत राहावे असे महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे ती बरोबर आहे. सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्राबाबत वेगळा अर्थ काढू नये. या पत्राच्या निमित्ताने 3 वेगवेगळ्या पक्षाची भूमिका उघड झाली आहे असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले.