धाराशिव – समय सारथी
शासकीय कामकाजाचे टेंडर मिळाले असुन त्यासाठी पैसे हवे आहेत, तुम्ही 7 लाख रुपये द्या 2 महिन्यांनी 10 लाख परत देतो असे आमिष दाखवात फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रयास उर्फ शंभूराजे भोसले असे आरोपीचे नाव असून तो भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा राज्य कार्यकारी सदस्य आहे. त्याने शिवसेना ठाकरे गटाच्या मनीषा वाघमारे यांची फसवणूक केली.
प्रयास भोसले याला पैशाची गरज होती त्यामुळे त्याने मनीषा वाघमारे यांच्याकडुन यांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून 7 लाख रुपये 2 महिन्यासाठी घेतले मात्र ते परत न देता फसवणूक केली. पैसे परत मागितल्यावर ते परत न करता तुमच्या शासकीय कामात अडथळा आणु असे म्हणून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
प्रयास उर्फ शंभूराजे भोसले हा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील होळ येथील असुन त्याने अनेक लोकांना अश्याच पद्धतीने राज्यात वेगवेगळी आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. मोठ्या नेत्यासोबत फोटो काढून जनसंपर्क असल्याचे दाखवत भूल थापा मारून राज्यभर गंडा घातल्याचा आरोप वाघमारे यांनी केला आहे. आनंदनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(4)351(2), (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.