उमरगा – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना घडली आहे. चक्क 24 बोटांच्या बाळ जन्मला असून त्या बाळाच्या हात पाय प्रत्येकी 6 बोटे आहेत. रेणुका सागर वीटकर याना हे बाळ झाले असुन ही त्यांची दुसरी प्रसूती आहे, बाळाचा जन्म होताच सगळीकडे त्याची चर्चा होऊ लागली आहे.
वैद्यकीय शास्त्रातील ही दुर्मिळ घटनाच म्हणावी लागेल, सामान्यत: मानवाच्या प्रत्येक हाताला आणि पायाला प्रत्येकी पाच बोटे असतात पण या बाळाच्या प्रत्येक हाताला आणि पायाला प्रत्येकी 6 बोटे आहेत.. म्हणजेच प्रत्येक हाताला आणि पायाला प्रत्येकी एक बोट अधिक दिसून येते. दरम्यान जन्मलेले बाळ आणि बाळाची आई दोघेही सुखरूप आहेत.
उमरगा शहरातील समर्पण क्लिनिक चे बालरोग व नवजात शिशु तज्ञ डॉ नचिकेत इनामदार यांची याबाबत प्रतिक्रिया दिली व काही बाबींमुळे असते घडते असा उलघडा केला.