धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी देवीच्या भक्तांना मंदीर संस्थानने प्रसाद म्हणुन लाडु वाटप करण्याचा निर्णय घेतला असुन 50 ग्राम लाडुची किंमत 30 रुपये म्हणजे 600 रुपये किलो असा दर होतो. दर आणि दर्जा यावर टीका होत असतानाच चितळे बंधू यांचा हा लाडु प्रसाद केवळ 5 दिवस टिकणारा आहे. निर्मितीच्या तारखेपासुन 5 दिवसाच्या आत सेवन करावे असा उल्लेख लाडु प्रसादाच्या पॉकेटवर केला आहे. तुळजाभवानी मंदीर संस्थानला पुरवला जाणारा हा लाडु पुणे जिल्ह्यातील भोर येथे तयार केला जातो, हा लाडु 5 दिवस टिकणारा असल्याने भक्तांत नाराजी आहे. 600 रुपये किलो दराच्या लाडुवरून या प्रसादाला पुजारी व भक्तांनी विरोध केला आहे.
श्रावण महिना आणि तुळजाभवानीच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक दाखल होत असुन मंदिर प्रशासनाने प्रसाद वाटपाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चितळे बंधू यांच्या प्रसिद्ध लाडुची निवड करण्यात आली आहे. या लाडूला चव नसल्याचे व दर्जा उत्तम नसल्याचे भाविकांचे म्हणणे आहे शिवाय बाजारभावाच्या दुप्पट दर आहे. मोफत नको पण माफक दारात तरी द्या अशी भाविकांची मागणी आहे.