5 आरोपींचा जामीन मंजुर, इतरांचा शोध सुरु – परंडा बाजार समिती संचालक अपहरण व राडा प्रकरण
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीतील महाविकास आघाडीच्या संचालकांचे अपहरण करुन जबर मारहाण केल्याप्रकरणी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत गटाचे कार्यकर्ते सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे यांच्यासह 5 आरोपीना कोर्टातुन मोठा दिलासा मिळाला आहे.
कांबळे यांच्यासह 5 जणांना माढा कोर्टाने जामीन मंजुर केला. जवळपास 30-35 जणावर गुन्हा नोंद झाल्यावर कांबळे यांच्यासह 5 जणांना सोलापूर पोलिसांनी केली होती त्यानंतर कोर्टाने 29 मे पर्यंत 5 दिवसांची पोलिस कोठडी दिली होती त्यानंतर कोर्टाने जामीन मंजुर केला.
मुख्य आरोपी सुरेश उर्फ सूर्यकांत चंद्रकांत कांबळे याच्यासह प्रदीप पाडूळे, समाधान मिस्कीन, किरण उर्फ लादेन बरकडे व जगदीश ठवरे पाटील यांना जामीन मिळाला असुन या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्ह्याचा तपास सुरु असुन पडद्यामागून या अपहरण कटात सहभागी असलेल्याचा शोध सुरू आहे.
परंडा बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीपूर्वी बंदुकीचा धाक दाखवून अपहरण करीत महाविकास आघाडीच्या संचालकांना मारहाण करण्यात आली होती. समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष जयकुमार जैन यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेम्भूर्णी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुरन 337/2023 भादवि कलम 327,326, 324, 363,365,323,143,147,149,452, 504,506, सह आर्म ॲक्ट कलम 3,25 व सार्वजनिक संपत्ती आणि प्रतिबंध अधिनियम 1984 चे 3 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर हे करीत आहेत.