34 महसुली मंडळात शेतकऱ्यांना मदत करा – जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांची अधिसुचना, 21 मंडळातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस न पडल्याने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 36 महसूली मंडळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी देत अधिसूचना काढली आहे.
पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य विमा नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीने अधिसूचना जाहीर झाल्यापासून 1 महिन्यात मदत करावी असे आदेश काढले आहेत. सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील 57 पैकी 36 महसूली मंडळात शेतकऱ्यांना मिळणार मदत आहे तर उर्वरित 21 मंडळातील शेतकऱ्यांना अद्याप मदतीची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या प्रमाणात हेक्टरी 5 ते 8 हजार दरम्यान मदत मिळू शकते असा कृषी विभागाचा अंदाज आहे.