धाराशिव – समय सारथी
पार्सलद्वारे ड्रग्ज मागविले असल्याची बतावणी करून 21 लाख 73 हजारांची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील संजय विष्णु ठाकुर यांना 12 डिसेंबर ते 21 डिसेंबर 24 या काळात मोबाईल क्र 8882184682 च्या धाराकाने पोलीस गणवेश परिधान करुन लोकसेवक असल्याची बतावणी केली. सायबर क्राईम ब्रँचमधून बोलतो असे सांगून संजय ठाकुर यांचे आधार कार्डचा गैरवापर करुन पार्सलद्वारे ड्रग्ज मागविले असल्याचे बतावणी करुन 21 लाख 73 हजार 952 रुपयांची ऑनलाईन फसवणुक केली. फिर्यादी संजय ठाकुर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318(4), 204, 347(2) सह 66(सी),66(डी) माहिती तंत्रज्ञान सुधारित अधिनियम 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस तपास करीत असुन पोलिस असल्याचे सांगून कारवाईची धमकी दिल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.