धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात धाराशिव पोलिसांनी 2 आरोपीना अटक केली आहे. तुळजापूर येथील जगदीश पाटील या आरोपीला लातूर येथून तर अभिजीत गव्हाड या आरोपीला सोलापूर येथून अटक करण्यात आली त्यानंतर धाराशिव येथील कोर्टाने त्यांना 18 ऑगस्ट पर्यंत 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनवली आहे.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 8 आरोपी फरार असून त्यात मुंबई येथील मुख्य तस्कर वैभव गोळे, इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले, विशाल सोंजी व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे यांचा समावेश आहे. पोलिसांनी 38 आरोपींचे सेवन व तस्कर असे 2 गट केले असुन 28 आरोपी तस्कर तर 10 आरोपी सेवन गटात आहेत.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 38 आरोपी असुन अलोक शिंदे,उदय शेटे,विनोद उर्फ पिटू गंगणे, रणजीत पाटील, शुभम नेप्ते, दुर्गेश पवार, अभिजीत अमृतराव व राजू उर्फ पिट्टा सुर्वे या 8 आरोपीना जामीन मिळाला आहे. 2 पोलीस कोठडीत 8 आरोपी फरार असुन 20 आरोपी धाराशिव येथील कारागृहात आहेत.
पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे तपास करीत आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी कोर्टात बाजु मांडत आहेत.
38 पैकी 8 आरोपी फरार असुन त्यांना अटक करणे पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सर्व फरार आरोपीना 15 ऑगस्टपर्यंत अटक करुन जामीनावर असलेल्या आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी असे आदेश दिल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.
5 आरोपींचे जामीन अर्ज धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी स्तरावर प्रलंबित आहे. नानासाहेब खुराडे 14 ऑगस्ट शामकुमार भोसले 13 ऑगस्ट रोजी, पिनू तेलंग व विनायक इंगळे 13 ऑगस्ट, चंद्रकांत बापू कणे 12 ऑगस्ट तर नियमित सुनावणी 12ऑगस्ट रोजी होणार आहे.