धाराशिव – समय सारथी
शारीरिक मानसिक त्रासाला कंटाळून व अनैतिक संबंधातुन कळंब येथे महिलेची हत्या करण्यात आली आहे. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी एका आरोपीस मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी बीड जिल्ह्यातील केज येथील रामेश्वर भोसले व उस्मान सय्यद या 2 जणाविरुद्ध गुन्हा नोंद करुन अटक केली आहे. ही महिला ड्राइवर असलेल्या रामेश्वरचा नग्न फोटो व व्हिडिओ दाखवून छळ करीत होती, त्या त्रासाला कंटाळून खुन करण्यात आला. घटनेच्या आदल्या दिवशी महिलेने त्याला 100 उठाबशा काढायची शिक्षा दिली त्याने तरुण वैतागला व टोकाचा निर्णय घेतला. बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा या हत्येत कोणता संबंध नसल्याचा पोलिसांचा दावा आहे.
मनीषा कारभारी- बिडवे,मनीषा आकुसकर, मनीषा बियाणी, मनीषा उपाडे, मनीषा गोंदवले अशी वेगवेगळी या महिलेची नावे असुन पुरुषांना जाळ्यात ओढून क्लिप काढुन ही महिला ब्लॅकमेल करायची व बलात्काराचा गुन्हा नोंद करायची अशी चर्चा आहे. मनीषा बिडवे हिच्याकडे मागील काही महिन्यांपासून रामेश्वर भोसले नावाचा तरुण काम करत होता. तो सुरुवातीला तिचा ड्राइव्हर होता. नंतर संबंधित महिलेसोबत त्याचे सबंध जुळले. नंतर ती त्याला त्याचे नग्न फोटो आणि व्हिडीओ दाखवून टॉर्चर करू लागली. गुन्हा दाखल करायची धमकी देऊन त्याचा छळ करायला लागली. दररोज आरोपी रामेश्वरला मारहाण करून शारीरिक छळ करत होती. या सगळ्या त्रासातून त्याने तिच्या डोक्यात वार केला. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.
खुन केल्यावर संबंधित आरोपी 2 दिवस मृतदेह असलेल्या घरात राहिला, जेवण ही तिथेच करायचा. तिसऱ्या दिवशी वास येऊ लागल्याने ती तिथून तिची गाडी घेऊन बाहेर पडला. यादरम्यान त्याने त्याचा केजचा असलेला मित्र उस्मान सय्यद याला द्वारका नगरीत आणून मृत बॉडी दाखवली. दोघेही सुरुवातीला पुरावे नष्ट करायला आल्याचे कळते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उस्मानला ताब्यात घेतलं, त्यानंतर मुख्य आरोपी रामेश्वर भोसले याला देखील अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे , फरहानखान पठाण, जावेद काझी या पोलीस पथकाने आरोपींना पकडण्यात यश मिळवले.