10 लाखांचे नुकसान, अकस्मात आगीची नोंद – जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी आग प्रकरणी गुन्हा नोंद
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात लागेल्या आगीत 10 लाख रुपयांचे नुकसान झाले असुन अकस्मात आगीचीचे कारण सांगत पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आगीत विविध शासकीय कागदपत्रे, संगणक, फर्निचर असे अंदाजे 10 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगत गुन्हा नोंद केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय येथील पुरवठा व नगर परिषद प्रशासन विभागाला आग लागली होती. अनेक कागदपत्रे जळून खाक तर संगणक यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आली असुन आगीच्या कारणांचा शोध सुरु आहे. यानिमित्ताने शासकीय कार्यालयातील फायर ऑडिटचा मुद्दा समोर आला आहे.
नुकताच उघड झालेला नगर परिषदेतील विविध घोटाळे यासह अनेक अनेक चौकशी प्रकरणे व इतर कागदपत्रे ही नगर परिषद प्रशासन विभागात होती. कोणती कागदपत्रे जळून खाक झाली हे अजून समोर आले नाही. आग लागल्यानंतर लागली की लावली याची तर्कवितर्कसह मोठी चर्चा होत आहे.