1 कोटींचा घोटाळा – 3 अधिकाऱ्यावर धाराशिव पोलिसात गुन्हा नोंद
धाराशिव – समय सारथी
शेषखडयाचे कामे न करता आभासी कामे दाखवुन स्वतःच्या फायदयासाठी 1 कोटी 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी तायडे यांच्यासह 3 जणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धाराशिव पंचायत समिती विविध घोटाळ्यांनी गाजली असुन शोषखड्डे, शेवगा लागवड, घरकुल, मातोश्री पानंद रस्ते यासह अन्य घोटाळ्याची पोलखोल दैनिक समय सारथीने केली होती त्यानंतर गुन्हे सुद्धा नोंद झाले, आता आणखी घोटाळे समोर येतच आहेत.
पंचायत समिती येथील संजय हनुमंतराव घोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तत्कालीन गटविकास अधिकारी एस.डी.तायडे, सहायक लेखा अधिकारी आर. जे. लोध व डेटाएन्ट्री ऑपरेटर व्ही.डी.राउत यांनी पदाचा दुरुपयोग करुन हा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. घोंगडे यांची डीएससी वापरुन खेड,मेडसिंगा,बेंबळी,ढोकी व उपळा येथील शेषखडयाचे कामे न करता आभासी कामे दाखवुन स्वताच्या फायदयासाठी त्यांचे हितसंबंधाचे नावे 1 कोटी 12 लाख 28 हजार 936 रुपये वर्ग करुन शासनाच्या रकमेचा उपहार करुन फसवणुक केलेली आहे.
संजय हनुमंतराव घोंगडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कलम 420,409,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.