स्वप्नपूर्ती, गेडाम इन ऍक्शन – वरिष्ठ आयएएस डॉ प्रवीण गेडाम हावर्ड विद्यापिठात मास्टरेट, महाराष्ट्रात रुजू होणार
हार्वर्ड – समय सारथी
महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा राज्यातील वरिष्ठ आयएएस डॉ प्रवीण गेडाम यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर) पदवी प्राप्त केली. गेली काही वर्षांपासून ते शैक्षणिक सुट्टीवर होते मात्र आता ते या यशानंतर पुन्हा प्रशासकीय सेवेत ऍक्शन मध्ये येणार आहेत ते लवकरच महाराष्ट्र शासनात रुजू होणार आहेत.
राज्यात गेली दीड दशकापासुन डॉ गेडाम हे लोकउपयोगी कामाने प्रसिद्ध असुन एक दबंग अधिकारी अशी ओळख सर्वदूर आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनात डॉ गेडाम यांनी एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
डॉ प्रवीण गेडाम यांनी फुलब्राईट शिष्यवृत्तीवर हार्वर्ड विद्यापीठात सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर शिक्षण (मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ) सुरु केले. जून २०२३ मध्ये ६ वर्षाच्या कालखंडानंतर त्यांनी यश मिळविले आहे.
धाराशिव येथे जिल्हाधिकारी असताना डॉ गेडाम यांनी अमूलाग्र बदल करीत निर्णय घेतले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दरबारात त्यावेळी झालेला सिंहासन पेटीतील सोने चांदी अपहार हा केवळ डॉ गेडाम यांच्यामुळे तो उघड झाला त्यानंतर सीआयडीने गुन्हा नोंद केला. तसेच तुळजाभवानी देवस्थानच्या मालकीची जमीन परत घेणे, रेशन माफियासह भुमाफियावर डॉ गेडाम यांनी अहवाल अहवाल सादर केल्याने फौजदारी गुन्हे दाखल झाले व कारवाई झाली. तत्कालीन माजी मंत्री सुरेश जैन यांचा घरकुल घोटाळा डॉ गेडाम यांच्यामुळे बाहेर आला त्यानंतर त्यांच्यासह अनेकांना जेलवारी झाली.
सोलापूर येथे सुद्धा डॉ गेडाम यांनी चुणूक दाखवत वाळू माफिया, भुमाफिया यांची नाकेबंदी केली होती.
डॉ गेडाम यांनी त्या त्या वेळी अनेक जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्या विरोधात अहवाल दिले होते मात्र त्यावर अनेक ठिकाणी ते अहवाल लाल फितीत अडकले, पुढे काही कारवाई झाली नाही मात्र आता डॉ गेडाम हे पुन्हा महाराष्ट्रात रुजू झाल्यावर ते बॉम्ब फुटणार आहेत