सोलापूर – उस्मानाबाद या 84 किलोमीटर रेल्वेमार्गासाठी 33 गावातील 660 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार असुन रेल्वे मार्गात येणाऱ्या जमिनीचे संपादन करण्यास पुढील आठवड्यात प्रत्यक्षात सुरवात केली जाणार आहे. सोलापूर- उस्मानाबाद रेल्वेमार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जोडले जाणार आहेत. या मार्गाच्या कामास दिवसेंदिवस गती मिळत आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे निर्माण उपमुख्य अभियंता यांनी भूसंपादन बाबत प्रस्ताव पाठविला असुन यात सरकारी, खासगी व सांजा उस्मानाबाद शिवारातील प्लॉट धारक जमीनीचा समावेश आहे.यात तुळजाभवानी मंदिर संस्थान, औद्योगिक विकास महामंडळ, सांजा गावातील जमिनी असलेल्या श्रीराम मंदिर देवस्थान तडवळे यांच्या मालकीच्या जमिनी आहेत. सांजा गावातील संपादित होणारी श्रीराम मंदिर देवस्थान जमीनपैकी काही जमीन ही खासगी लोकांच्या ताब्यात आहे मात्र सात बारा उतारा व इतर मालकी कागदपत्रे ही देवस्थानच्या नावाने आहेत तशीच बाब तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीबाबतही आहे.