सीमावाद पेटला – कर्नाटक पोलिसांनी उभारले तात्पुरते चेक नाके
शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी केला विरोध
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला असुन महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत कर्नाटक पोलिसांनी तात्पुरते चेक नाके उभारले आहेत त्यामुळे सीमा भागात तणावाचे वातावरण आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील कसगी येथे सीमेवर कर्नाटक पोलिसांनी सीमा तपासणी चेक नाके उभारण्याचा प्रयत्न केला असुन त्याला शिवसैनिकानी विरोध केला. उमरगा मतदार संघाचे शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत तीव्र विरोध केला व हा डाव वेळीच उधळला.
आमदार चौगुले यांनी याबाबत उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. कर्नाटकच्या या अतिक्रमण प्रकरणाने आगामी काळात या भागात वाद पेटणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या लगत महाराष्ट्र हद्दीत कर्नाटक पोलिसांनी तात्पुरते सीमा तपासणी नाके उभे केले आहेत, सीमा नाके हे नेहमी आपआपल्या राज्याच्या महसुली भागात उभारले जातात, गुलबर्गा जिल्हाधिकारी यांनी खसगी भागात पाहणी करून कर्नाटक शासनाच्या वतीने या भागात नव्याने कायमस्वरूपी सीमा तपासणी नाके उभे करण्यात येणार असल्याची माहिती दिल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली.या प्रकाराची माहिती मिळल्यानंतर आमदार चौगुले यांनी शिवसैनिकांना या भागात जाण्याचे आदेश दिले त्यांनतर हा डाव तात्पुरता उधळला. या भागात तपासणी नाके उभारण्याच्या घटनेने नागरिकांत कर्नाटक सरकार व पोलीस विरोधात तीव्र असंतोष आहे. सीमावाद होऊन पुढील काळात या भागात तणावपूर्ण व संवेदनशील स्तिथी निर्माण होण्याची शक्यता आहे तरी जिल्हाधिकारी यांनी या भागात महसुली हद्दीत असे प्रकार करण्यास कर्नाटक पोलिसांना कायदेशीररित्या रोखावे व सामाजिक सलोखा राखावा अशी मागणी आमदार चौगुले यांनी केली आहे