उस्मानाबाद जिल्ह्यात आज 283 रुग्ण तर 4 जणांचा मृत्यु
जिल्ह्यात 1 हजार 970 ऍक्टिव्ह रुग्ण
उस्मानाबाद : समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून आज कोरोना रुग्णांच्या संख्येने 283 रुग्णांचा आकडा पार केला आहे तर आज 4 जणांचा उपचार दरम्यान दुर्दवी मृत्यू झाला. आज कोरोनाने 4 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील एक जण हा 30 वर्षाचा तर दुसरा 41 वर्षाचा तरुण आहे त्यामुळे ही बाब चिंतेची आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक 161 रुग्ण सापडले तर उमरगा तालुक्यात 27 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 1 हजार 970 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 58 हजार 893 नमुने तपासले त्यापैकी 20 हजार 818 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 16.14 टक्के आहे. जिल्ह्यात 18 हजार 248 रुग्ण बरे झाले असून 87.65 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 600 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.88 टक्के मृत्यू दर आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 161 रुग्ण , तुळजापूर 16, उमरगा 27, लोहारा 15, कळंब 22, वाशी 17, भूम 13 व परंडा तालुक्यात 12 रुग्ण सापडले आहेत
कोरोनाचा वाढता आलेख पहा
1 मार्च – 9
2 मार्च – 40
3 मार्च – 16
4 मार्च – 45
5 मार्च – 26
6 मार्च – 30
7 मार्च – 49
8 मार्च – 16
9 मार्च – 38
10 मार्च – 24
11 मार्च – 58
12 मार्च – 27
13 मार्च – 54
14 मार्च – 69
15 मार्च – 52
16 मार्च – 123
17 मार्च – 94
18 मार्च – 164
19 मार्च – 119
20 मार्च – 125
21 मार्च – 118
22 मार्च – 173
23 मार्च – 130
24 मार्च – 176
25 मार्च – 174
26 मार्च – 155
27 मार्च – 224
28 मार्च – 184
29 मार्च – 239
30 मार्च – 242
31 मार्च – 253
1 एप्रिल – 283