धाराशिव – समय सारथी
ग्रामविकास विभागाने सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी धाराशिव जिल्ह्यातील 621 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित केले आहे. ही प्रक्रिया महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम, 1964 मधील नियम 2-अ व शासन अधिसूचना क्रमांक 87, दिनांक 5 मार्च 2025 अन्वये पार पडत आहे. आरक्षण निश्चित करताना 2011 च्या जनगणनेनुसार तालुक्यातील लोकसंख्या आणि अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे प्रमाण लक्षात घेण्यात आले आहे.
आरक्षण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व नियमानुसार पार पडावी, यासाठी स्थानिक वृत्तपत्रांमधून प्रसिद्धी, तसेच दवंडीव्दारे जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय आरक्षण कार्यक्रमाची चित्रफीत (व्हिडीओ) तयार करून, उपस्थितांची स्वाक्षरीसह संपूर्ण कार्यवाहीचे दस्तावेजीकरण करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत.
तालुकानिहाय आरक्षणाचा आढावा :
धाराशिव तालुका (110 ग्रामपंचायती)
अनुसूचित जाती – 19 (महिला 9)
अनुसूचित जमाती – 4 (महिला 2)
मागासवर्ग – 30 (महिला 15)
खुला प्रवर्ग – 57 (महिला 29)
तुळजापूर तालुका ( 108 ग्रामपंचायती)
अनुसूचित जाती – 18 (महिला 9)
अनुसूचित जमाती – 1
मागासवर्ग – 29 (महिला 15)
खुला प्रवर्ग – 60 (महिला 30)
उमरगा (80 ग्रामपंचायती)
अनुसूचित जाती – 13 (महिला 7)
अनुसूचित जमाती – 2 (महिला 1)
मागासवर्ग – 22 (महिला 11)
खुला प्रवर्ग – 43 (महिला 21)
लोहारा (44 ग्रामपंचायती)
अनुसूचित जाती – 7 (महिला 3)
मागासवर्ग – 12 (महिला 6)
खुला प्रवर्ग – 25 (महिला 13)
कळंब (92 ग्रामपंचायती)
अनुसूचित जाती – 18 (महिला 9)
अनुसूचित जमाती – 2 (महिला 1)
मागासवर्ग – 25 (महिला 12)
खुला प्रवर्ग – 47 (महिला 24)
वाशी (41 ग्रामपंचायती)
अनुसूचित जाती – 6 (महिला 3)
अनुसूचित जमाती – 2 (महिला 1)
मागासवर्ग – 11 (महिला 6)
खुला प्रवर्ग – 22 (महिला 11)
भूम (74 ग्रामपंचायती)
अनुसूचित जाती – 10 (महिला 5 )
अनुसूचित जमाती – 1 (महिला 1)
मागासवर्ग – 20 (महिला 10)
खुला प्रवर्ग – 43 (महिला 21)
परंडा (72 ग्रामपंचायती)
अनुसूचित जाती – 9 (महिला 5)
अनुसूचित जमाती – 1 (महिला 1)
मागासवर्ग – 19 (महिला 9)
खुला प्रवर्ग – 43 (महिला 21)
खुला प्रवर्ग – 43 (महिला 21)