श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात होळी पोर्णिमा कोरोनाच्या सावटाखाली साजरी
तुळजापुर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या नगरीत संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात व शहरात होळी पोर्णिमा सण कोरोनाच्या सावटाखाली साजरा झाला.होळी पोर्णिमा दिनी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात पारंपारिक पद्धतीने सायंकाळी येथील होम कुंडाजवळ होळीचे पुजन करुन मोजक्याच प्रमुख मान्यवराच्या हस्ते भक्तीभावाने “आई राजा उदो उदोच्या गजरात होळी प्रज्वलीत करून होळी पोर्णिमा सन साजरा करण्यात आला.यावेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा,श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, मुख्य भोपे प्रशांत संभाजी पाटील, संकेत पाटील संजय सोंजी आदीसह पाळीकर पुजारी,मातेचे सेवेदार पुजारी दुर्गेश छञे, अमर चोपदार, छञे,पोहेकर पलंगे आदीसह भोपे पुजारी पाळीकर पुजारी मंदीर कर्मचारी संकेत वाघे उपस्थित होते.
श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीरातील होळी प्रज्वलीत झाल्यानंतर शहरातील गल्लीतील व घरोघरी होळीचे पूजन होळी प्रज्वलीत करुन बोंब मारुन होळी पोर्णिमा सन अंत्यत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला,घरोघरी होळी पोर्णिमा निम्मीत गोडा धोडा नैवद करुन होळीस दाखविण्यात आला.
सायंकाळी श्री तुळजाभवानी मातेची नित्योपचार प्रक्षाळ पूजा होवुन श्री देवीचे मुख्य महंत वाकोजीबुवा यांनी मंदीरात “जोगवा” मागुन होळी पोर्णिमा सन अंत्यत साध्या पद्धतीने साजरा केला रविवारी सायंकाळी शिमगा(होळी) पोर्णिमाचा छबिना काढण्यात आला नाही या शिमगा(होळी) पोर्णिमेचा छबिना गुडी पाडव्या दिनी काढण्यात येतो.रविवारी सायंकाळी प्रक्षाळ पुजेनंतर श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर बंद करण्यात आले त्यानंतर शेकडो वर्षापासुन चालत आलेल्या रुढी पंरपंरेनुसार पद्धतीने येथील श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा मठ, व महंत चिलोजी बुवा मठ यांच्या मठातील धुलीवदंनाचे औच्युत साधुन दोन्ही मठातील महानैवद राञी परत एकदा श्री तुळजाभवानी मातेचे दरवाजे उघडून श्री देवीजीस महानैवद दाखविण्यात आले.