धाराशिव – समय सारथी
शिवसेना व भाजप विरुद्ध हा लढा नाही,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात चांगला संवाद आहे. प्रेस नोट राणाजगजीतसिंह पाटील काढतात इतरांना काही अधिकार नाही. घराणेशाहीमुळे पाटील कुटुंबाच्या दावणीला सगळे बांधले गेले आहेत. एका सर्वेत सेनेच्या 21 जागा व 4 संभाव्य असे होते. तिथे उमेदवार दिले नाहीत. संदीप मडके यांच्यासह उमेदवार तिकीट दिले नाही, काही घुसखोर शिवसेनेत घुसले आणि त्यांनी भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेच्या जागेवर देण्याचे काम केले असा आरोप अविनाश खापे यांनी केला.
सावंत यांना प्रत्येक वेळी डावलले जाते, सावंत यांचे कुटुंब फोडून धनंजय सावंत यांना पुरस्कृत उभे केले, मग ही गद्दार नाही का ? अजित लाकाळ यांच्या बॅनरवर सावंत यांचा फोटो नको म्हणुन सांगितले, तिथे सावंत यांचे फोटो टाकू नये यासाठी दबाव आणून भाग पाडले, त्या अटीवर निवडणुक लढविली गेली. चंद्रपूर येथे भाजप उबाठा एकत्र आले हे चालत मग इथे का दुखतं.खरे विश्वासघाती तुम्ही आहेत असा आरोप केला.
मी कशाला राष्ट्रवादी वाढवू असे अर्चना पाटील म्हणाल्या म्हणुन त्यांना लोकांनी पाडले, शिवसेनेने त्यांचे काम केले. साळवी यांना बुजगावणे बनविले, शिवसैनिक प्रमाणे ते लढले नाहीत असा आमचा आक्षेप आहे. नितीन काळे व दत्ता कुलकर्णी यांना बुजगावणे बनविले. पक्ष संघटनेला अर्थ राहिला नाही असे दिसुन येते असा आरोप केला.
आमदार, खासदार यांच्या घरात उमेदवारी द्यायची नाही अशी फडणवीस यांची भुमिका होती, प्रतारना कोण करतंय याचे उत्तर आधी विचारा,ही आसुरी प्रवृत्ती आहे.भाजपमध्ये सर्वसाधारण जागेवर जे होते, ते पुढे स्पर्धक होतील म्हणुन त्यांना सुद्धा पाडले. घराणेशाहीमुळे भाजप पदाधिकारी यांच्यावर अन्याय होत आहे. शिवसेनेचे जे सदस्य नेले ते परत आणून दिले नाही तर त्या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करू असा इशारा दिला.
तुमचे 36 कोण आहेत ते दाखवा मग आम्ही आमच्या सोबत असलेले 28 जन दाखवु, सावंत यांना सोबत न घेता सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. आमच्या सोबत 28 जण आहेत, उपमुख्यमंत्री यांच्या आदेश आला की दाखवू मात्र लोकांना असे संभ्रम करू नका.
धाराशिव जिल्ह्याला यांनी आकांक्षीत ठेवले त्यामुळे यांची दुष्काळी व दळभद्री मानसिकता आहे. 276 कोटी स्थगितीबाबत का बोलले नाही. निवडून आलेले आमचे 2 सदस्य सोडा मग नंतर काय ती चर्चा करू. धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात इथे घराणेशाही काय पद्धतीने सुरु आहे हे सर्व 3 पक्षाच्या प्रमुखांना भेटून, आमच्या व्यथा व वस्तुस्थिती मांडणार असल्याचे खापे म्हणाले.












