शिक्षकाकडुन 25 हजारांची लाच – संस्थेच्या बांधकामासाठी घेतली 25 हजार लाच
शिक्षण क्षेत्रात शिक्षकांची होत असलेल्या पिळवणूकीचे वास्तव समोर – संस्थाचालक व मुख्याध्यापक अडकले
उस्मानाबाद – समय सारथी
एका संस्थेतील सहशिक्षकाची वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून ती मंजूर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागून 25 हजारांची लाच स्वीकारले प्रकरणी एका सहशिक्षकाला लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. संस्थेच्या बांधकाम निधीच्या नावाखाली 50 हजार रुपये लाच म्हणून मागण्यात आली त्यात 25 हजारावर सेटलमेंट केली. संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी शिक्षकाला 50 हजारांची लाच मागितली आणि 25 हजार रक्कम अंतीम केली, लाचेची ही रक्कम स्वतः न स्वीकारताएका सहशिक्षकाला घ्यायला लावला होती मात्र हा सहशिक्षक लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला. संस्थाचालक व मुख्याध्यापक आणि सहशिक्षक हे तिघे जण आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. काम करणाऱ्या सहकारी शिक्षकाकडुन मुख्याध्यापक, संस्थाचालक व शिक्षकाने लाच मागितल्याने शिक्षण विभागातील पिळवणूकीचे वास्तव समोर आले आहे.
पाडोळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक महाविद्यालय येथे लाचलुचपत विभागाने कारवाई केली असून या संस्थेचे संस्थाचालक व मुख्याध्यापक हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. लाचलुचपत विभागाचे उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणात चौकशी सुरू असून लवकरच पुढील कारवाई केली जाणार आहे.
यात नवल वाटण्या सारखे किंवा बातमी देण्या सारखे विशेष कांही नाही.
व्यवस्था आणि प्रशासन चुकीचे आहे. त्यात पारदर्शी पणा आला की बाकी सर्व ठीक होईल.
ही बातमी चुकीची आहे, पूर्वनियोजित डाव आहे. संस्थाचालक, कारखानदार फक्त 25 हजार रुपयांची लाच कशाला मागेल? तो लाख करोड रुपये मागेल. जर विचारपूर्वक बातमी लिहीत जा.