शिंदे गटाने दिले हे 3 चिन्हाचे पर्याय – बाळासाहेबांची शिवसेना
उस्मानाबाद – समय सारथी
बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आता पक्ष चिन्ह म्हणून वेगवेगळे 3 असे 6 पर्याय देण्यात आले आहेत त्यात रिक्षा, शंख व तुतारी या चिन्हाचा एका ई-मेल मध्ये समावेश आहे तर दुसऱ्या ई-मेलमध्ये पिंपळाच झाड, सूर्य व ढाल – तलवार असे 3 चिन्ह आहेत. हे पर्याय ई-मेल द्वारे निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार हे 6 पर्याय शिंदे गटाने दिले असून त्यावर आज निर्णय होणार आहे. यापूर्वी दिलेले त्रिशूळ, गदा हे चिन्ह धार्मिक असल्याचे सांगत नाकारण्यात आले होते.
उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या गटांना निवडणूक आयोगाने नावे दिले आहेत त्यात दोन्ही गटांच्या नावात शिवसेना हे शब्द असणार आहे. उद्धव ठाकरे यांना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे नाव देण्यात आले आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले आहे. एकंदरीत दोन्ही गटाच्या नावात शिवसेना हा शब्द असणार आहे. ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिले आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 3 पर्याय देण्यास सुचवले होते त्यानुसार हे पर्याय दिले आहेत.