शाईफेक – स्वतंत्र विद्यापीठाचा वाद पेटला, व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडून शाईफेक
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असतानाच विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांच्यावर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडून औरंगाबाद येथे शाईफेक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र उस्मानाबाद येथे असून या उपकेंद्र ठिकाणी स्वतंत्र विद्यापीठ करावे अशी मागणी होत आहे. यानुसार स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याबाबत अहवाल सरकारने मागितला होता उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक यांनी 24 मे रोजी भेट देऊन पाहणी केली होती. उस्मानाबाद येथे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व संघटनानी स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्यासाठी एकमुखाने सहमती दर्शविली होती तसेच याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते.
आज औरंगाबाद विद्यापीठ परिषद सभागृहाच्या बाहेर निंबाळकर यांच्यावर रिपब्लिकन सेनेचे सचिन निकम यांनी शाईफेक केली यावेळी गुणरत्न सोनवणे,पवन पवार, मनीष नरवडे, सचिन गायकवाड, राहुल वडमारे यांनी आंदोलन केले.
नामांतर चळवळीत बलिदान देणाऱ्याचा अपमान करून राज्यात दंगली पेटविण्याचे जातीयवादी षडयंत्र हाणून पाडण्यासाठी मोठा लढा उभारू, प्रसंगी बलिदान देण्याची आंबेडकरी कार्यकर्त्यांची तयारी आहे, कोणत्याही स्तिथित विभाजनाचा डाव हाणून पाडू असे निकम म्हणाले.
बेसावध असताना अंगावर शाईफेक केली अश्या प्रकारांना मी घाबरत नाही. उस्मानाबाद व औरंगाबाद असा वाद नसून ही मागणी जुन 2014 मध्येच केली अशी, तसा ठरवही आहे.माझ्याशी भांडणापेक्षा या कार्यकर्ते यांनी सरकारशी बोलावे.
मराठवाडा विद्यापीठाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर नामकरण करताना मराठवाड्यात अनेक ठिकाणी जातीय तणाव व दंगली झाल्या, डॉ आंबेडकर विद्यापीठाचे विभाजन करण्यासाठी आंबेडकरी संघटना यांचा विरोध आहे.